निट्टूरची अनुजा लोहार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2024

निट्टूरची अनुजा लोहार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय भीम तरूण मंडळ कोवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये कु. अनुजा दत्तात्रय लोहार (रा. निट्टूर, इयत्ता - बारावी (सायन्स) श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले हा विषय घेण्यात आला होता. तसेच कोवाड पंचक्रोशीत तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment