चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
किल्ले पारगडच्या पायथ्याशी आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उ्साहात साजरी झाली. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच तुकाराम सुतार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रघुवीर शेलार, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा कांबळे, माजी सरपंच संतोष पवार, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कांबळे, यशवंत कांबळे, कृष्णा कांबळे, राजाराम कांबळे, हरी कांबळे उपस्थीत होते.
कायक्रमाचे अध्यक्ष शेलार व उपस्थीत मान्यवर यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी आंबेडकर जयंतीचा र्यक्रम हा केवळ आंबेडकर नगर पुरता मर्यादित नसून गावातील प्रत्येक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे मत व्यक्त केले. माजी सरपंच पवार यांनी ही बाबासाहेबांचे विचार तसेच शिकवण या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. तसेच शालेय विद्यार्थांनीही मनोगते व्यक्त केली. संदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक्षा कांबळे यांनी आभार मानले. यावेळी योगेश कांबळे, संजय कांबळे, मोहन कांबळे, साईप्रसाद कांबळे, गोविंद कांबळे, दीपक कांबळे, रोहन कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment