मांडेदुर्ग येथील शिवाई फार्म प्रोडूसर कंपनीचा सांगलीच्या नेचर केअर फर्टीलायझर कंपनीकडून बक्षीस देवून सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2024

मांडेदुर्ग येथील शिवाई फार्म प्रोडूसर कंपनीचा सांगलीच्या नेचर केअर फर्टीलायझर कंपनीकडून बक्षीस देवून सन्मान

नेचर केअर फर्टीलायझर कंपनीकडून सन्मान स्विकारताना शिवाई फार्म प्रोडूसर कंपनीचे सदस्य 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         2023 हे वर्ष जागतिक भरडधान्य / तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर झाले आहे. त्या अनुषंगाने तृणधान्य भरणे विषयात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पाच कंपन्यांची निवड केली होती. या व्यक्ती व संस्थांना सांगली विटा येथील नेचर केअर फर्टीलायझर या कंपनीने पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील शिवाई फार्म प्रोडूसर  या कंपनीला सन्मानचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये बक्षीस देवून सन्मानीत करण्यात आले.

        हा पुरस्कार अभिनेत्री  मृण्मयी देशपांडे व जागतिक कृषी तज्ञ डॉ. आशिष वेले तसेच युवा कृषी तज्ञ स्वप्निल राव, कंपनी हेड जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे, प्रांजली बोरसे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी कंपनीचे अध्यक्ष गणपत पवार, संदीप पाटील, निंगाप्पा पाटीलविनोद टक्केकर, तानाजी डसके, धनंजय खवणेवाडकर, अजुन डसके, भागवता पाटील,  पुजा ढोकरे,  अर्चना रेडेकर, साक्षी पवार, कविता  टक्केकर, सुवर्णा गुंडप व तेजस्विनी टक्केकर उपस्थित होत्या.

       शिवाई फार्मर्स कंपनीने चंदगड तालुक्यातील खेडे गावात कंपनीची स्थापना करून नाचणीसारख्या पौष्टिक गुणधर्मांनी युक्त भरड धान्याचे उत्पादन सुरू केले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रक्रिया उद्योग देखील सुरू केला आहे.  या माध्यमातून ते नाचणी व इतर धान्यापासून बिस्किटे, पापड, नूडल्स अशा प्रकारची नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करत करून विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. त्यांच्या उपक्रमामुळे लोकांना रोजगार मिळत आहे. नाचनी या धान्याचे बाजारातील महत्त्व लोकांना व्यापारीदृष्ट्या समजल्याने अनेक तरुण धान्याची शेती करणास प्रवृत्त होत आहेत.

No comments:

Post a Comment