चंदगड / प्रतिनिधी
मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ . सुरेश पाटील यांनी दिली . पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल २ तर इलेक्ट्रोनिक्सच्या ११ विद्यार्थ्याची निवड केली.
जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रोनिक्स - १ विद्यार्थ्याची निवड झाली आहे . टाटा मोटर्स मध्ये इलेक्ट्रिकल - २ , इलेक्ट्रोनिक्स ४ विद्यार्थ्याची निवड झाली आहे . जीई एविएषन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मध्ये सिविल च्या ११ विद्यार्थ्यांची निवड झाली . हिकव्हिजन कंपनी कडून इलेक्ट्रिकलच्या ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . कमिंस इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकल -३ , इलेक्ट्रोनिक्स -१० विद्यार्थ्याची निवड झाली आहे . आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या ३ तर गॅब्रीअल पुणे येथे इलेक्ट्रोनिक्सच्या ६ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली.
सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे , लार्सन & टुब्रो मुंबई , फ्लश इलेक्ट्रोनिक्स , KSPG ऑटो , ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे . संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे . संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ . विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे . या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ . एस ए . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ . संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अथक प्रयत्न करत आहेत .
No comments:
Post a Comment