चंदगडच्या कन्येचा कोल्हापूरात डंका, दहावी परीक्षेत मिळविले ९९% गुण - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2024

चंदगडच्या कन्येचा कोल्हापूरात डंका, दहावी परीक्षेत मिळविले ९९% गुण

 

कु. श्रद्धा गणपत सुतार

चंदगड / प्रतिनिधी 
       कोल्हापूर येथील आदर्श प्रशालेची विद्यार्थ्यीनी कु. श्रद्धा गणपत सुतार हिने दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयाची प्रेरणा मिळाली. तिने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मनपाच्या नेहरूनगर विद्यालय व जरगनगर विद्यालयात पूर्ण केले. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतही ती राज्यात पहिली आली होती. ती मूळची चंदगड गावची रहिवासी असून तिचे आई - वडील दोघेही शिक्षक आहेत. चंदगड येथील उत्कृष्ट फर्निचर कारागिर रामचंद्र सुतार यांची श्रध्दा ही नात होय.

No comments:

Post a Comment