हलकर्णी महाविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त प्रा. एच. के. गावडे व रामदास पवार यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2024

हलकर्णी महाविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त प्रा. एच. के. गावडे व रामदास पवार यांचा सत्कार


चंदगड / प्रतिनिधी

कुठलेही काम करताना त्या कामाचा आनंद मोठा असतो. आपण केलेले कार्य आपल्या मनाला समाधान देत असेल तर ती आपल्या कामाची पावती असते कामाचा आनंद आपल्या सेवेत असतो. प्रा. गावडे यांनी त्यांचे काम आनंददायी केले आहे. असे उद्गार दौलत विश्वस्त संस्थेचे संचालक,मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी काढले. हलकर्णी, ता.चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या प्रा. एच.के. गावडे व रामदास पवार यांच्या सेवापूर्ती सत्कार प्रसंगी अध्यक्षीय मनोगत ते बोलत होते. 


यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील मल्लिकार्जुन मुगेरी,मनोहर होसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी.डी.अजळकर यांनी केले.यावेळी प्रा.आर.बी.गावडे, एस एन पाटील, प्रा. एन. एम कुचेकर, श्री प्रशांत शेंडे, सदानंद सिताप, प्रा. सौ .जे. एम. उत्तुरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा .एच. के. गावडे आणि रामदास पवार यांचा सप्तनिक सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. मानपत्र वाचन प्रा. एस एन खरूजकर यांनी केले. प्रा एच के गावडे यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाबाबत आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना मांडल्या.रामदास पवार यांनीही आपले मनोगत मांडले. 

यावेळी या कार्यक्रमास नितीन पाटील सुनिल कोंडूसकर विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. ए. बोभटे यानी तर आभार डॉ. राजेश घोरपडे यांनी मानले.संस्थेचे संचालक मंडळ तसेच समाजातील हितचिंतक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment