कालकुंद्री येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त बैलांना अशा पद्धतीने सजवून पूजा करण्यात आली. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात आज 'कर्नाटकी बेंदूर' तथा बैलपोळा सणाचा उत्साह दिसून आला. शेतकऱ्यांचा प्रामाणिक व कष्टाळू मित्र म्हणून शेतीशास्त्रात बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभर शेती मशागतीच्या माध्यमातून आपली सेवा करणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, निट्टूर, कागणी, किणी आदी गावांत या सणानिमित्त शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा राजा बैलांना सजवून त्यांची पूजा मनोभावे पूजा केली. त्यांना उंडे, लाह्या खाऊ घातले. शेतकरी सवाष्ण महिलांनी पंचारतीने बैलांना ओवाळले. परिसरातील काही गावातून बैलांची शिंगे रंगवून, अंगावर रंगीबेरंगी झुली चढवून तसेच शिंगांना रिबीन बांधून बैलांच्या मिरवणूका काढण्यात आल्या. यावेळी शेतकरी बांधवांचा उत्साह व बैलांबद्दलचा आदरभाव ओसंडून वाहत होता.
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या कर्नाटक सीमेलगतच्या भागात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहाने साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment