चंदगड / प्रतिनिधी
आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत जयप्रकाश विद्यालय किणी येथे भारत - एकसंघ राष्ट्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.जे. मोहनगेकर होते.
मराठी साम्राज्याचे शूर योद्धे शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्राणाहुती दिनानिमित्त फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एम एन शिवणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर यांनी आपल्या मनोगतातून भारत देशाचा इतिहास,संस्कृती, परंपरा ही निसर्गाला अनुसरून आहे हे स्पष्ट केले.विविधतेत एकता हे आपल्या भारत देशाचे वैशिष्टय आहे हे स्पष्ट केले. मानवता हाच खरा आपल्या राष्ट्राचा धर्म आहे आणि आपण मानवता टिकवली पाहिजे हे आपले कर्तव्य आहे हे स्पष्ट केले.
सध्याची प्रसारमाध्यमे आणि त्यांचा समाज जीवनावर होणारा परिणाम विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केला. चंदगडी ग्रामीण बोली भाषेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांनी हसत खेळत आनंदाने या व्याख्यानाचा पुरेपूर आनंद लुटला.आपण नेहमी सदविवेक बुध्दी ने वागले पाहिजे असा संदेश दिला. वृक्षाची परोपकार वृती आपण सर्वजण अंगी बाणवूया आणि आपले जीवन चांगले करूया असा मुलांना संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. व्ही. सुतार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीम. एम. पी कांबळे आभार डी. एस. बिर्जे मानले.
No comments:
Post a Comment