चंदगड / सी एल वृतसेवा
वाढता मानव व वन्यजीव संघर्ष, सर्पदंश रोखणे व गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी नागणवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालया मध्ये वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांच्या मार्फत सर्प व पक्षी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रोजेक्टर वरती व्हिडिओ द्वारे साप कसे ओळखायचे, त्यांच्यापासून काय काळजी घ्यायची, सर्पदंश झाल्यावर काय करायचे, सापांविषयी चे गैरसमज, पक्षांचे महत्त्व यासारख्या गोष्टींबद्दल वन्यजीव अभ्यासक व रक्षक श्री विकास माने यांनी माहिती दिली.
यावेळी पाटणे वनपरीक्षेत्राचे वन क्षेत्रपाल (RFO) प्रशांत आवळे, चंदगड वनपरीक्षेत्राचे वनपाल कृष्णा डेळेकर, माळवडे येथील वनरक्षक प्रकाश शिंदे, वनविभाग पाटणेचे वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर, कोवाड येथील वन्यजीव छायाचित्रकार अजित पाटील, चंदगड येथील वन्यजीव रक्षक श्रीपाद सामंत यांच्यासोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर, के. डी. बारवेलकर, व्ही. बी. पाटील, एस. एस. गुरव, ए. डी. पाटील, एस. एस. पाटील, सौ. एस. व्ही. पाटील व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment