कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक बसल्याने कोवाड (ता. चंदगड) येथील शेतकरी बाबू विठोबा वांद्रे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ नंतर घडली. घटनेची फिर्याद अर्जुन तुकाराम वांद्रे यांनी कोवाड पोलिसात दिली आहे.
याबाबत कोवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी शेतकरी बाबू विठोबा वांद्रे रा. कोवाड हे काल २२ रोजी आपल्या तांबाळ नावाच्या शेतातील भाताला खत टाकण्यासाठी गेले होते. त्यांना शेतातील वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक खांबावरील तुटून खाली पडलेल्या तारेचा शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री दहापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांचा शोध घेतला असता वरील प्रकार उघडकीस आला. घटनेचा अधिक तपास पोहे को जमीर मकानदार व कुशाल शिंदे हे करत आहेत.
चंदगड तालुक्यात गेल्या आठवड्यात विजेचा शॉक लागून माळावर चरणाऱ्या चार म्हशींचा मृत्यू झाला होता. यात संबंधित शेतकऱ्याचे साडेतीन लाखांहून अधिकचे नुकसान झाले होते.
No comments:
Post a Comment