चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन क्लब, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये अभिनव सृजनशीलता व रक्षाबंधन (क्रिएटिव्हिटी) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध कौशल्यावर आधारित उपक्रमांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
स्वयंसेवक भगिनींनी राखीचा धागा बांधून बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. फाउंडेशनच्या समन्वयक मनस्विनी कांबळे व शिल्पा दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. एन. के. पाटील यांनी उपस्थिताचे आभार मानले.
No comments:
Post a Comment