डॉ. आनंद महाराज गोसावी |
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
हत्तरगी (ता. जि. बेळगाव) येथील पुरातन श्री हरी काका गोसावी भागवत मठाचे वतीने दि २६, २७ व २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने विविध आध्यात्मिक, संगीत सेवा यासह गोपाळकाला कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मठाचे उत्तराधिकारी डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खा. प्रियंका जारकीहोळी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, यांच्यासह कन्नड संस्कृती विभागाचे सहायक संचालक श्रीमती विद्याती बजत्रि आदी उपस्थित राहणार आहेत. २६ रोजी सकाळी ११ वा प्रति वर्षी प्रमाणे भव्य आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रात्री १० वाजता सौ स्वरदा पटवर्धन हरिदास (सांगली) यांचे श्री कृष्ण जन्म काळ व कीर्तन होईल. २७ रोजी सायंकाळी ६ वा श्रुती मराठे विश्वकर्मा (मुंबई) यांचे भक्तीगीत गायन आणि मानसा ग्रामपुरोहित (हुबली) यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. २८ रोजी दुपारी दोन वाजता गोपाळकाला आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी केले आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment