चंदगड मतदार संघातील नरेवाडी, केंचेवाडी, बुरूडे, किणे, मुंगुरवाडी, होणेवाडी, कानोली, निंगुडगे, कोवाडे, हत्तीवडे यांचा मानसिंग खोराटे यांना पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2024

चंदगड मतदार संघातील नरेवाडी, केंचेवाडी, बुरूडे, किणे, मुंगुरवाडी, होणेवाडी, कानोली, निंगुडगे, कोवाडे, हत्तीवडे यांचा मानसिंग खोराटे यांना पाठींबा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड विधानसभा मतदार संघातील नरेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर चंदगड विभानसभेच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी  मानसिंग खोराटे यांना पाठींबा दिला. यावेळी आर. डी. पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, रमेश भांबर, उत्तम पाटील, संभाजी पाटील, परशराम पाटील, राणबा बेर्डे उपस्थित होते.

       चंदगड मतदार संघातील केंचेवाडी ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभेसाठी मानसिंग खोराटे यांना कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन पाठबळ दिले . यावेळी सिताराम भोंगाळे (माजी सरपंच केंचेवाडी), विजय जाधव (उद्योजक), भिवा जाधव (उपसरपंच), दत्तगुरु आवडण (माजी उप सरपंच), बाळु जाधव, तानाजी पाटील, विनोद घोळसे उपस्थित होते. 

    चंदगड विधानसभा मतदार संघातील बुरूडे, किणे, मुंगुरवाडी, होणेवाडी, कानोली, निंगुडगे, कोवाडे, हत्तीवडे येथील ग्रामस्थांसोबत अथर्व-दौलत साखर कारखान्याच्या स्थळी बैठक पार पडली. विकासाची वाटचाल ही कायम सोबतीनेच करायची असते, याच विचारांतून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ग्रामस्थांनी समर्थन देण्याचे ठरविले.

     यावेळी बुरुडे येथील अमित गुरव (सरपंच बुरडे), ⁠सूर्यकांता कांबळे. किणे येथील दशरथ अत्याळकर व ⁠किशोर नांदवेकर. होणेवाडी येथील कृष्णा पाटील (शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई सचिव), अमित पाटील. कानोली येथील राजकुमार भोगम, परशुराम भोगम, संजय सावरतकर. निंगुडगे येथील महेश भोसले, सागर कांबळे. कोवाडे येथील शशिकांत तांबेकर,  अमोल कांबळे, विठ्ठल कांबळे. हत्तीवडे येथील सुयश पाटील, (सरपंच - हत्तीवडे), गणपत पाटील, बाळू कांबळे. मुंगुरवाडी (गडहिंग्लज) चांदोबा देसाई (शिवशाहू प्रतिष्ठान), शुभम सलामवादे व इतर गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment