चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदार संघातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील गावकर्यांसोबत अथर्व-दौलत साखर कारखान्याच्या हॉलमध्ये बैठक पार पडली. या सर्व गावकर्यांनी चर्चेत मतदारसंघाचा सर्वांगीण शाश्वत विकास व्हावा. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी मानसिंग खोराटे यांना पाठींबा दिला. यावेळी शिप्पुर तर्फ नेसरी येथील आनंदराव मटकर (माजी उपसभापती पंचायत समिती), बाबुराव गुरव, बयप्पा पाटील, सर्वेश जोशीलकर, राजू सुरेश फडके हे उपस्थित होते.
चंदगड मतदार संघातील हिटणी ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभेसाठी मानसिंग खोराटे यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन येणाऱ्या विधानसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. हिटणी येथील अक्षय शंकरगोंडा पाटील (एकनिष्ठ ग्रुप संस्थापक अध्यक्ष गडहिंग्लज), सुधीर खनदाळे, अक्षय पाटील, अमोल व्हजी, विनायक मिरजे, श्रीनाथ गुरव, विनायक केदारी, श्रीधर किल्लेदार हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment