तेऊरवाडीचे दयानंद पाटील जागतिक परिषदेसाठी दुबईला रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2024

तेऊरवाडीचे दयानंद पाटील जागतिक परिषदेसाठी दुबईला रवाना

 

दयानंद वसंत पाटील

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
     तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील  विमा सल्लागार दयानंद  वसंत पाटील हे जागतिक विमा परिषदेसाठी दुबईला रवाना झाले. 27 ते 30 ऑगस्ट रोजी दुबई मध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषदेमध्ये ते सहभागी होत आहेत.
      गेली 21 वर्ष ते विमा व्यवसायामध्ये काम करत असताना उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत  14 वेळा M.D.R.T व 2 वेळा C.O.T (USA) चा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या दुबई परिषदेसाठी तेररवाडी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment