कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा १८/०८/२०२४ रोजी चेअरमन पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पाडली.
संस्थापक कै बाळासो कोकितकर यांच्या फोटो पूजनाने सभेची सुरुवात झाली. संचालक प्रा सुखदेव शहापूरकर यांनी प्रास्ताविक करताना राजीव गांधी पतसंस्था ही स्व भांडवलावर चालणारी संस्था असून संस्थेच्या कुदनूर, राजगोळी, कोवाड, हलकर्णी फाटा, यशवंतनगर शाखेतील सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच संस्थेने सातत्याने प्रगती केल्याचे सांगितले. व्यवस्थापक नामदेव कोकितकर यांनी अहवाल वाचन केले. चेअरमन पी बी पाटील यांनी संस्थेच्या ३० वर्षातील प्रगतीचा आढावा घेताना गत आर्थिक वर्षात संस्थेचे एकूण भाग भांडवल २ कोटी ७२ लाख पेक्षा अधिक झाले असून संस्थेला ५१ लाख ९४ हजार २१६ रुपये नफा झाल्याचे सांगितले. सभासदांना १५ टक्के लाभांश गणेश चतुर्थी पूर्वी देण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी कुदनूर गावची सुकन्या छाया सिद्धाप्पा बम्बर्गेकर हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तर मयुरी चंद्रकांत निर्मळकर हिचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी व व्यवस्थापक एस वाय पाटील यांचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चेअरमन पी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक गवंडी, विजयालक्ष्मी कोकितकर, कृष्णा मांडेकर, निंगाप्पा माने, उत्तम कोकितकर, विष्णू बागीलगेकर, झिम्माना पाटील, शिवाजी नौकुडकर, जुबेर काजी यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश कुंभार यांनी केले. पुंडलिक नौकुडकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment