तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
'एक पेड मां के नाम' या वृक्षलागवड मोहीमेअंतर्गत सामाजिक वनीकरण गडहिंग्लज परिक्षेत्राच्या वतीने हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील रोपवाटिकेत दि. २२ ऑगष्ट २०२४ रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
वड, लिंबू, अशोक अशा प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी सामाजिक वनीकरण गडहिंग्लज परिक्षेत्राचे वनपाल सागर पाटील, लिपिका श्रीम. रूबीना सोलापूरे, वनसेवक दत्ता पाटील, रामचंद्र पाळेकर, मनोज पाटोळे तसेच मल्लाप्पा नाईक (पोलिस पाटील हडलगे), शिवाजी पाळेकर , निलेश देसाई (ग्रामस्थ तारेवाडी ), पत्रकार संजय पाटील उपस्थित होते . ज्या रोप वाटीकेने आतापर्यंत लाखो रोपे तयार करून गडहिंग्लज व चंदगड तालूक्यातील वनसंपदा फुलवली अशा रोपवाटीका परिसरात आज वृक्षारोपन करण्यात आले . दोन महिन्यांपूर्वी या रोपवाटीकेचे जंगली हत्तीने लाखो रुपयांचे नुकसान केले होते. पण अशाही स्थितीत येथील वनसेवक दत्ता पाटील यानी वनपाल सागर पाटील, एस एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्कृष्ट रोपवाटीका तयार करून उत्तम दर्जाच्या रोपांचे ग्रामपंचायत व शाळांना वाटप केले आहे. आज याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
No comments:
Post a Comment