नेसरी / सी एल वृत्तसेवा
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे शिवप्रेमी मंडळातर्फे शिवप्रेमी चौकाचे नूतनीकरण करण्यात आल्याने या चौकाचे रूपच पालटले आहे. चौकात 'आम्ही अर्जुनवाडीकर' या डिजिटल फलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या फलकाचे अनावरण गावच्या सरपंच सौ. हेमांगी देसाई यांनी केले तर कॅप्टन रवींद्र मंडलिक यांनी फलकाच्या कट्ट्याचे अनावरण केले. फलकाच्या विद्युतीकरणकामी ग्रामपंचायतचे मोलाचे सहकार्य लाभले. दयानंद पाटील यांनी फलक उभारण्यात सहकार्य केले. यावेळी सर्व शिवप्रेमी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment