माणगाव हायस्कूलमध्ये पाणी फिल्टरचे शुभारंभ करताना मुख्याध्यापक के. बी. नाईक
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
माणगांवचे सुपुत्र नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे माजी मुख्याध्यापक एस्.आर.पाटील व कै.श्री सी.आर.पाटील यांचे सुपुत्र जगदीश सी.पाटील , सुशीलकुमार एस.पाटील ,अनिल गड्डी,दयानंद टुबाकी, नंदकुमार कोल्हापूरे यांच्याकडून व डॉ.विशालक्षी शिवशंकर फौंडेशन ट्रस्ट बेंगळुरू कडून श्रीमती शारदा रूद्राप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ माणगाव (ता चंदगड ) येथील श्री शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजला पाण्याचा फील्टर भेट देण्यात आला. या पाणी फिल्टरचे शुभारंभ मुख्याध्यापक के.बी.
नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आर बी गावडे , पी वाय पाटील , एस डी पाटील , ए आर कांबळे आदि मान्यवर शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते . याप्रसंगी पाटील कुटुंबीयांचे पाणी फिल्टर उपलब्ध करून दिल्या बद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment