शिवनगेचे सुपुत्र जे.डी.पाटील‌ यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2024

शिवनगेचे सुपुत्र जे.डी.पाटील‌ यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

               

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्विकारताना जे. डी. पाटील

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
    शिक्षक दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या  वतीने  देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ चंदगड तालुक्यातील शिवनगे गावचे रहिवासी  सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या  जे. डी. पाटील यांना प्रदान करण्यात आला. 
      महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सुरज मांडरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह , मानपत्र, एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. जे डी पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नं.३ सासोली हेदूस  व सध्या बांदा नं.१केंद्र शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत  महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जे डी पाटील  यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. जे.डी पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिवनगे येथील  शाळेत पुर्ण केले आहे तर उच्च माध्यमिक बागिलगे डुक्करवाडी काॅलेज मध्ये झाले असून‌ बारावीच्या  परीक्षेत सहकार विषयात बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मानही मिळवला होता.जे.डी.पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल  तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment