विष्णू पाटील शिक्षक पतसंस्थेची सभा खेळीमेळीत, ८ टक्के लाभांश - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2024

विष्णू पाटील शिक्षक पतसंस्थेची सभा खेळीमेळीत, ८ टक्के लाभांश

विष्णू पाटील शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोवाड : सी एल वृत्तसेवा
   कोवाड (ता. चंदगड) येथील कै विष्णू पाटील (जिज्ञासा) प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोमवार दिनांक ९ सप्टेंबर  २०२४ रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे पार पडलेल्या सोळाव्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाळकृष्ण मुतकेकर होते.
    स्वागत व्हा. चेअरमन धोंडीबा कुट्रे यांनी केले. प्रास्ताविक करताना चेअरमन मुतकेकर यांनी प्रगतीचा आढावा घेतला. अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन सचिव महेश आंबेवाडकर यांनी केले. यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील व पा रा पाटील यांची भाषणे झाली. यावर्षी झालेल्या नफ्यातून सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर केला होता. तो सभेच्या समाप्तीनंतर रोख स्वरूपात वाटप करण्यात आला.
   यावेळी अहवाल सालात सेवानिवृत्त झालेले शिक्षक सभासद श्रीकांत वैजनाथ पाटील, वैजनाथ विठोबा हेब्बाळकर, पांडुरंग रामू पाटील, रमेश जनबा पाटील, श्रीकांत सुबराव पाटील, दत्तात्रय बाबू नाईक, तुकाराम जानबा पाटील आदींचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय प्रज्ञाशोध, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता दहावी बारावी गुणवत्ताधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक तसेच विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या सभासदांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक कविता विष्णू पाटील, संजय दत्तात्रय पाटील, शुभांगी महादेव नाईक, अशोक दिनकर भोईटे, अशोक ईराप्पा पाटील आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन संचालक आप्पाजी रेडेकर यांनी केले. सुनील मारुती कुंभार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment