विक्रीसाठी बेकायदेशीर दारू बाळगणाऱ्या मांडेदुर्ग येथील एकावर गुन्हा, रु 27,800 चा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2024

विक्रीसाठी बेकायदेशीर दारू बाळगणाऱ्या मांडेदुर्ग येथील एकावर गुन्हा, रु 27,800 चा मुद्देमाल जप्त

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथे बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने रुपये 27 हजार 825 इतक्या किमतीची दारू बाळगल्याने एकावर चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. विनायक प्रकाश चौथे (वय 38 रा. मांडेदुर्ग) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

    याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, या घटनेतील संशयित आरोपी विनायक चौथे हा 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री आठच्या सुमारास गावातील ब्रह्मलिंग दूध डेअरी लगत असलेल्या भावेश्वरी गल्लीतील बोळात विविध कंपन्यांच्या दारू व बियर बाटल्यांसोबत पोलिसांना आढळला. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 280 /2024  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. गुन्ह्यात  जप्त केलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे मॅकडॉल व्हिस्की 750 मिली च्या 5 बाटल्या, टूबर्ग स्ट्रॉंग बियर काचेच्या 24 बाटल्या, गॅरेसबर्ज स्मूथ बियर 24 बाटल्या, नॉक आउट हाय पंच बियर 24 बाटल्या, किंगफिशर स्ट्रॉंग बियर 24 बाटल्या, डीएसपी ब्लॅक 90 मिली 67 बाटल्या, रोमनोव व्होडका 180 मिली चार बाटल्या, ओल्ड मंक रम 180 मिली दोन बाटल्या असा एकूण 27 हजार 825 रुपये चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ जमीर मकानदार हे करत आहेत.

No comments:

Post a Comment