चंदगड : सी एल वृत्तसेवा
बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना चंदगड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. काल दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोदाळी गावाच्या हद्दीत हॉटेल ग्रीन व्हॅली नजीक तिलारी घाट ते चंदगड मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. यातील संशयित आरोपी चंद्रकांत कुम्माणा कांबळे रा. कोदाळी ता. चंदगड व राजू सुदाम कांबळे सध्या रा. तिलारीनगर मुळगाव केंबळी ता. कागल यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शितल भगीरथ धवीले पोलीस उपनिरीक्षक चंदगड यांनी दिली.
वरील संशयित आरोपी आपल्या ताब्यातील टाटा विंगर गाडीतून डीएसपी ब्लॅक व्हिस्की, रॉक व्हिस्की, किंगफिशर बियर, हायवर्ड फाईन व्हिस्की या गोवा बनावटीची लेबल असलेल्या दारूच्या बाटल्या महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने विनापरवाना वाहतूक करीत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी चार चाकी वाहनासह ५ लाख ५ हजार ९५० रुपये किमतीचा माल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ ई, ९०, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत.
No comments:
Post a Comment