चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
केंचेवाडी (ता. चंदगड) येथील ओंकार अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १३ ते रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य खुल्या हरी पाठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ह भ प संजय तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या स्पर्धांचे उद्घाटन १३ रोजी सकाळी ११ वाजता अथर्व- दौलत शुगरचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक- ११,१११, द्वितीय क्रमांक- ९०००, तृतीय क्रमांक- ६०००, चतुर्थ क्रमांक- ५०००, पाचवा क्रमांक- ४००० अशी रोख बक्षीसे व गौरव चिन्ह. तर उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट शिस्तबध्द संघ यांना प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस मिळणार आहे. याशिवाय विशेष म्हणजे सहभागी प्रत्येक संघाला रोख रुपये १००१ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु ५०१ आहे.
स्पर्धेसाठी वेळ ७० मिनिटे राहील. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघानी आपली नावे गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर पूर्वी नोंदवावीत त्या साठी 8698575700, 9403106516, 8007657044, 8767190248 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment