शिवणगे येथील जे. डी. पाटील यांना शासकीय आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक संघाकडून सत्कार |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच शिवणगे तालुका चंदगड येथील जे डी पाटील यांना प्राप्त झाला. जे डी पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा प्राथमिक शाळेत कार्यरत असून जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. जे डी पाटील यांच्या निमित्ताने चंदगड तालुक्याचाच सन्मान झाला आहे. प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) संघटनेच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटील व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस सटुप्पा फडके, विमुक्त जाती शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी नाईक, जिल्हा उपाध्यक्ष जी एस पाटील, तालुका उपाध्यक्ष महादेव सांबरेकर, दिग्विजय फडके, सुहास रेडेकर, मारुती चांदेकर, अमित पाटील, पवार आदींची उपस्थिती होती.
फोटो
आदर्श शिक्षक पुरस्कार बद्दल जे डी पाटील व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करताना शिक्षक संघाचे पदाधिकारी
No comments:
Post a Comment