सेवानिवृत्त प्राचार्य एन एल जाधव यांचा सत्कार करताना सरपंच संगीता सुतार सोबत इतर सेवानिवृत्त शिक्षक व मान्यवर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून गावातील प्राथमिक व माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सतबा रामा हेब्बाळकर, दुद्दापा संतू पाटील, महादेव सुबराव पाटील, नारायण लक्ष्मण जाधव आदी सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. त्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच सौ संगिता दशरथ सुतार, माजी सरपंच कृष्णा नांदवडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील मुख्याध्यापक जानबा मारुती अस्वले उपस्थित होते. सत्कार मूर्तीनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेला रोख दहा हजार रुपये देणगी दिली.
कार्यक्रमाचे स्वागत सागर जोतिबा पाटील यांनी केले. प्रास्ताविक के जे पाटील यांनी केले. सुत्रसंचालन श्रीकांत तारीहाळकर यांनी केले.
No comments:
Post a Comment