सीए विक्रम पाटील व त्यांच्या कुटुंबीया सत्कार करताना एम जे पाटील, सुजाता पाटील व मान्यवरांसह ग्रामस्थ |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात गावचा सुपुत्र विक्रम तुकाराम पाटील हा सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्ती विक्रम याने शालेय जीवनापासून सीए परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत आपला अभ्यासातील खडतर प्रवास कसा होता याबद्दल उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना माहिती सांगितली.
यावेळी एम जे पाटील यांनी आपल्या मातोश्री कै रुक्मिणी जोतीबा पाटील यांच्या स्मरणार्थ वाचनालयाला पुस्तके भेट दिल्याबद्दल त्यांचा व माजी जिप सदस्या सौ सुजाता मारुती पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच संभाजी राणबा पाटील, ग्रामपं. सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, प्रा व्ही आर पाटील, निवृत्त पशुधन विकास अधिकारी विठ्ठल परीट, दीपक कालकुंद्रीकर, विक्रम पाटील यांचे आई वडील, कुटुंबीय, ग्रामस्थ व वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment