नागरदळेत दुर्गामातेची प्रतिष्ठापणा - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2024

नागरदळेत दुर्गामातेची प्रतिष्ठापणा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       नागरदळे (ता. चंदगड) येथे जय दुर्गामाता युवक मंडळ, आयोजित नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. जिजामाता हरिपाठ महिला भजनी मंडळ, बसर्गे याने राम कृष्ण हरीच्या गजरात व देवीच्या जयघोषात भव्य मिरवणुकीने  देवीची श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर येथे स्थापना करण्यात आली. यावेळी सर्व भाविक भक्तांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले. 

        पुन्नापा सुतार (रा. माणगाव ता. चंदगड) यांनी मूर्ती बनवली असून दुर्गामातेची मूर्ति ढोलगरवाडी मार्गे नागरदळे येथे आणण्यात आली. सालाबादप्रमाणे मंडळाचे माजी अध्यक्ष, गावचे माजी सरपंच मा. श्री दिलीप मारुती पाटील यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर नागरदळे बस स्टैंड पासून, मठ्ठ गल्ली, मारुती गल्ली ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर नागरदळे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. मंगल बाबू पाटील व  प्रतिष्ठित नागरिक सौ व श्री रामू जिवबा ओऊलकर यांच्या शुभ हस्ते दुर्गामातेची प्रतिस्थापना करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकरी, मानकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       तसेच नवरात्र मधे नऊ दिवस मंडळाकडून समाज प्रभोधनपर व्याख्यान, सेवानिवृत्त सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, झिम्मा फुगडी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुबराव पाटिल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment