चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
उद्यापासून नेपाळ येथे सुरू होणाऱ्या आशिया सेव्हन्स कप रग्बी स्पर्धेसाठी कोवाड महाविद्यालयाचा खेळाडू वल्लभ रामचंद्र पाटील (मुळगाव मलतवाडी (ता. चंदगड) याची भारतीय संघात निवड झाली आहे. ४ व ५ ऑक्टोबर २०२४ रोजी नेपाळमधील काठमांडू शहरात होणाऱ्या या स्पर्धेत आशिया खंडातील दिग्गज १७ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
![]() |
वल्लभ पाटील सह निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील खेळाडू व अधिकारी |
वल्लभ ला याकामी पुणे रग्बी असोसिएशन, महाराष्ट्र रग्बी असोसिएशन व इंडियन रग्बी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील धावपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या वल्लभने रग्बी सारख्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी अतिशय नवख्या असलेल्या क्रीडा प्रकारात घेतलेली भरारी कौतुकास्पद असून तालुका व जिल्हा स्तरावरील होतकरू खेळाडूंसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणारी आहे. त्याच्या निवडीबद्दल क्रीडा व विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment