आमरोळी येथे शुक्रवारी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2024

आमरोळी येथे शुक्रवारी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी 

       आमरोळी (ता. चंदगड) येथील नवरात्र उत्सव, भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खास शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. ४ रोजी रात्री ठिक ७.०० वाजता करण्यात आले आहे. हि स्पर्धा सर्वांसाठी खुली असून एकाच गावातील स्पर्धक असावेत. कोणताही एक वादक बाहेर गावचा चालेल. येताना आधार कार्ड, किंवा मतदान ओळखपत्र आणावे.

 या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १००१०, ९००९, ८००८, ७००७, ६००६, ५००५, ४००४, ३००३, २००२, १००१ शिस्तबद्ध संघ अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम- तबला वादक अशी वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. भजनी मंडळानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या भ्रमणध्वनीवर ९०४९८३२५२५ संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment