चंदगड : प्रतिनिधी
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न भु. पाटील ज्युनि. कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. एस. एन. निळकंठ म्हणाले की, "ज्याला ईश्वराचा सेवक व्हायचे त्याने वाणी, विचार करणे हे पवित्र ठेवले पाहिजे त्याने अखंड प्रामाणिक परिश्रम केले पाहिजेत. एखादी हस्तकला आत्मसात करावी कारण त्यामुळे घरोघरी उद्योग करता येतील व लाखो लोकांना रोजगार मिळेल.हे गांधीचेविचार आचरणात आणल्यास जगाचे कल्याण होईल."
प्राचार्य एन.डी. देवळे म्हणाले, "मुर्ती लहान पण किर्ती महान असणारे लालबहादूर शास्त्री हे अगदी हृदयी मऊ मुलायम स्वभावाचे परंतु प्रसंगी अगदी वज्रा सारखे कठीण हो ते.स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्यात मग्न राहिले.
रचनात्मक भूमिका, कठोर मेहनत, नियोजन बद्धता, निर्णयक्षमता, इमानदारी वृत्ती, प्रामाणिकपणा अशा अनेक आदर्श मूल्यांची प्रतिमा जोपासणाऱ्या या महान नेत्याला म्हणूनच महत्त्वाच्या अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागल्या." कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर. प्रा. एस. आर. शेख, प्रा.एन.डी. हदगल, ए. एन. नाडगौडा, पी. एच. सुतार, डी. जी. पाटील, विश्वास पाटील आदि शिक्षक व चतुर्थ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार शरद हदगल यांनी मानले.
No comments:
Post a Comment