दर्जेदार शैक्षणिक व्हिडियो निर्मितीत प्रशांत मगदूम यांचे उल्लेखनीय यश - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2024

दर्जेदार शैक्षणिक व्हिडियो निर्मितीत प्रशांत मगदूम यांचे उल्लेखनीय यश

 

प्रशांत मगदूम

चंदगड / प्रतिनिधी

      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 या स्पर्धांमध्ये बागिलगे-रामपूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील इंग्रजी विषयाचे अध्यापक प्रशांत एस . मगदूम यांना यांचे इ. 6 वी ते 8वी इंग्रजी विषय . तालुका स्तर प्रथम क्रमांक . तर जिल्हा स्तर द्वितिय क्रमांक. तसेच इ. 9वी ते 10 वी सामाजिक शास्त्रे यामध्ये तालुक स्तर प्रथम कृमांक तर जिल्ह स्तर द्वितिय क्रमांक प्राप्त केला आहे.

      प्रशांत मगदूम हे इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक असून त्यानी राज्य व जिल्हा स्तरावर मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्याचे इंग्रजी  व्यकरण विषयाचे प्रशांत मगदूम या नावाचे युट्युब चॅनल असून राज्यातील हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. चंदगड तालुक्यातील इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक व तंत्र स्नेही शिक्षक म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.त्याच्या या यशासाठी संस्था सचिव जे. बी. पाटील, तत्कालीन मुख्याध्यापक एस्. एस्. तुर्केवाडकर यांचे मार्गदर्शन व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment