चंदगड मतदारसंघात आज २० अर्ज दाखल, अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचे शक्ती प्रदर्शन तर मानसिंग खोराटे यांची बाईक रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2024

चंदगड मतदारसंघात आज २० अर्ज दाखल, अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचे शक्ती प्रदर्शन तर मानसिंग खोराटे यांची बाईक रॅली

 

चंदगड शहरातून शक्तीप्रदर्शन करुन उमेदवार अर्ज भरण्यासाठी जाताना अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते.

चंदगड / प्रतिनिधी

     चंदगड मतदार संघात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर अर्ज भरणाऱ्यांची भाऊगर्दी पहायला मिळाली. काहीं उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाने तर काहींनी साधेपणाने आपला अर्ज दाखल केला. चंदगड मतदारसंघासाठी आज दिवसभरात २० तर आतापर्यंत 25 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत 56 व्यक्तींसाठी 124 अर्जांचे वाटप केले आहे. 

नंदीनी बाभुळकर उमेदवार अर्ज भरताना. शेजारी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, संभाजीराव देसाई व इतर.

नंदीनी बाभुळकर (रा. कानडेवाडी) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून साधेपनाने आपले ४ उमेदवारी अर्ज दाखल केले. श्रीमती संध्यादेवी कृष्णराव देसाई/कुपेकर (रा. कानडेवाडी) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २ अर्ज दाखल केले आहेत. 

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवाजी पाटील, शेजारी भरमूआण्णा पाटील, शांताराम पाटील व इतर.

     आमदार राजेश नरसिंगराव पाटील (रा. म्हाळेवाडी) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून २ तर त्यांच्या पत्नी सौ. सुश्मिता राजेश पाटील यांनीही आपले २ अर्ज साधेपनाने दाखल केला आहे. 

अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे अर्ज दाखल करताना शेजारी ॲड. संतोष मळविकर व इतर.

श्रीकांत अर्जून कांबळे (रा. चंदगड) यांनी बहुजन समाज पक्षातून एक उमेदवारी अर्ज साधेपनाने दाखल केला आहे. 

विनायक पाटील अर्ज दाखल करताना.

अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार खालील प्रमाणे - 

शिवाजी शटुप्पा पाटील (रा. इनाम सावर्डे) यांनीही अपक्ष म्हणून चंदगड शहारातून शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला आहे. यांच्यासह अथर्व कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग गणपती खोराटे (रा. हळेवाडी) यांनी हलकर्णी येथील कारखाना साईट ते चंदगड इथपर्यंत बाईक रॅली काढून २ अर्ज दाखल केला. सौ. मनिषा मानसिंग खोराटे (रा. आजरा) यांनी २ अर्ज दाखल केले आहेत. 

गोपाळराव पाटील अर्ज दाखल करताना.

      यांच्यासह गोपाळराव मोतीराम पाटील (रा. शिवणगे), विनायक विरगोंडा पाटील (रा. महागाव), आण्णासाहेब विनायक पाटील (रा. महागाव), अक्षय एकनाथ डवरी (रा. नेसरी) यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज साधेपनाने दाखल केले आहेत. 

बाईक रॅलीने अर्ज भरण्यासाठी जाताना मानसिंग खोराटे

                        राजेश पाटील भरणार मंगळवारी (ता. २९) अर्ज 

          या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेश पाटील मंगळवारी (दि. 29) अर्ज दाखल करणार आहेत. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयपासून रॅलीने रवळनाथ देवालय येथे जाऊन देव रवळनाथाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

No comments:

Post a Comment