पर्यटन विकास, उद्योग व्यवसाय चालना देणार, विकास कामावर भर देणार...! शिवाजीराव पाटील यांचा मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2024

पर्यटन विकास, उद्योग व्यवसाय चालना देणार, विकास कामावर भर देणार...! शिवाजीराव पाटील यांचा मेळावा

 


आजरा - सी एल न्यूज प्रतिनिधी

     आजरा येथे शिवाजीराव पाटील यांचा भाजप कार्यकर्ते आजरा मेळावा तालुका पार पडला. त्यामध्ये भाजप कार्यकर्ते मालिक बुरुड, अरुण देसाई, दयानंद भुसारी, सुधीर चोडणकर तसेच सुधीरभाऊ कुंभार आजरा तालुका भाजप कार्यकर्ते उपस्थितीत जनसंपर्क मेळावा पार पडला, यावेळी मलिक बुरुड यांनी आपण शिवाजी भाऊ यांच्या पाठीशी आम्ही ठाम असून सर्वतोपरी मतदान मोठ्या टक्केवारीने देवून निवडणून देणार, त्याच प्रमाणे भाजप कार्यकर्ते अरुण देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवाजीराव पाटील यांचे गेल्या आमदारकीला उभे राहिले त्यावेळी मतदान कमी पडले तरी भाऊ मागार न घेता पुन्हा उभारले असून आम्ही आमच्या हक्काचा भाऊ शिवाजी भाऊ यांना प्रचंड मतांनी निवडून देणार यांची ग्वाही दिली.

      शिवाजीराव पाटील म्हणाले, आजही मला पक्षात घ्यायला ऑफर येत आहेत. पण विकासाचं काय गेल्या चाळीस वर्षात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता होती तरीही तालुक्याचा विकास कुठे झाला. आज पर्यत केवळ, सेवा, सोसायटी, दूध डेअरी, केडीसी गोकूळ यांच्या पलीकडे विकास गेलाच नाही, आजरा चंदगड तालुक्याचा सर्वांगीन विकास करण्यासाठी उद्योग रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीं कंपन्या येऊ इच्छितात लवकरच उद्योगाची सुरुवात होईल, आपली मुलमुली बाहेर शिकून नोकरीसाठी परगावी जातात त्यासाठी आपले भागात सोसायटी हॉस्पीटल मेडीकल कॉलेज प्रस्ताव दिला असून त्याचेही काम सुरू होईल, गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी बोलणी झाली असून त्यांच्या मदतीने आजरा चंदगड च्या पर्यटनाच्या दृष्टीने बोलणी झाली आहे.

    रस्ते, गटारे इतक्यापुरतं समिति न रहाता खऱ्या अर्थाने मतदार संघ पुढे आला पाहिजेत काम करतेवेळी कोणताही गट तट पक्ष जात धर्म बघत नाही. मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय आहे. विधानसभेचे पद असने विकासासाठी आवश्यक आहे. मी अपक्ष उभारणार आहे. माझे चिन्ह 'पाण्याची टाकी' हे निवडणार आहे, कारण पाणी हेच जीवन आहे तरी त्याचा विचार करून मी तेच चिन्ह निवडणार याची सर्वांना विनंती आहे. मोठ्या ताकतीने मला निवडून द्या. असे आवाहन केले. आनंदा कुंभार नगरसेवक आजरा यांनी आभार मानले. मेळाव्याला आजरा, चंदगड विधानसभा मतदार संघातील सरपंच, सदस्य, भाजप कार्यकर्ते, आणि मतदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment