यर्तेनहट्टीत हातभट्टी दारू बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2024

यर्तेनहट्टीत हातभट्टी दारू बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा
  यर्तेनहट्टी, ता चंदगड हद्दीतील उसाच्या शेतात गावठी हातभट्टी दारू बनवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना चंदगड पोलिसांनी रंगेहात पकडले. सर्व मुद्देमाल जप्त करून त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्हन्नाप्पा निंगाप्पा सनदी व बसवानी लक्ष्मण सनदी दोघेही रा. यर्तेनहट्टी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
  संशयित दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ऊस पिकाच्या शेतात प्लॅस्टिक बॅरल मध्ये भरलेले आंबट व उग्र वासाचे रसायन, दारू बनवण्यासाठी लागणारी प्लॅस्टिक, माती व स्टीलची विविध आकाराची भांडी, जाळण्यासाठी इंधन व कोळसा आधी वस्तू जमा करून गावठी हातभट्टीची दारू बनवण्याच्या तयारीत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून दोघांकडून ११,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख)(ग)(च) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सावंत व पोहेकॉ जमीर मकानदार करत आहेत.

No comments:

Post a Comment