चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील जागर जाणिवांचा विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार `शिव्या मुक्त अभियान` नुकतीच राबविण्यात आले. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष, जात धर्म, लिंग व्यवस्था, शारीरिक व्यंग या सर्वांच्या वरती उद्देशून सहज बोलताना अथवा भांडताना शिव्या दिल्या जातात. त्या बंद व्हाव्यात, सुसंस्कृत समाज व नागरिक घडावे. या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने परिपत्रक काढून हा उपक्रम राबवला आहे यानुसार या महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. वरील प्रमाणे कोणत्याही प्रकारची शिवीगाळ न करण्याची, व इतरही न करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल प्रमुख उपस्थित होते. जागर जाणिवांच्या विभाग प्रमुख, डॉ. सौ. आर. ए. कमलाकार यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन करून या उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन शिव्या मुक्त सुसंस्कृत समाज घडविण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. गोरल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. कविता कट्टी यांनी केले. तर आभार प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ.स्नेहल मुसळे, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. पी. एल. भादवणकर. डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. व्ही. के. गावडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment