खा. सुप्रिया सुळे डॉ. अमोल कोल्हे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
'271 चंदगड' विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जनता दल व मित्रपक्ष यांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते शरदराव पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व खंदे समर्थक संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मुलुखमैदान तोफा उद्या धडाडणार आहेत. महागाव ता. गडहिंग्लज येथील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ९.३० वाजता ही जाहीर सभा आयोजित केली आहे. सदर सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment