दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र
चंदगड (प्रतिनिधी) :
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व दौलत साखर कारखान्याचा सन २०२४-२५ सालचा ४२व्या गळीत हंगाम शुभारंभ गुरुवारी (दि. १४ नोव्हे. २०२४ रोजी) सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे. यावेळी ‘मोळी पुजना’चा कार्यक्रम पृथ्वीराज खोराटे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या गळीत हंगाम शुभारंभासाठी भागातील सर्व शेतकरी, वाहतुकदार व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अथर्व दौलत कारखान्याचा सन 2024-25 च्या हंगामात महाराष्ट्र शासन व साखर आयुक्त यांच्या नियप्रमाणे कारखान्याचे गाळप सुरू करण्यात येणार आहे. तथापी अद्याप मराठवाड्यामधील तोडणी वाहतूक यंत्रणा पोहचली नसल्याने विलंब होत आहे. सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीमुळे तोडणी यंत्रणा हजर होण्यास अडचणी निर्माण होत आहे. तरी महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक संपल्यानंतर संपूर्ण तोंडणी वाहतूक यंत्रणा हजर होऊन पूर्ण क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू होणार असल्याचे सी.ई.ओ. विजय मराठे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment