चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दुग्ध व्यवसाय हा शाश्वत रोजगार निर्माण करून देऊ शकतो असे मत गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये व्यक्त केले. दुभत्या जनावरांची काळजी उत्तम रीतीने घेतली तर दुग्ध व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. जनावरांची निवड करण्यापासून चाऱ्याचे नियोजन व गोठ्याची व्यवस्था करताना कोणती काळजी घ्यावी, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी व त्यातील फॅट वाढविण्यासाठी पाणी किती व कोणत्या वेळी द्यावे, लस भरण्यासाठी योग्य कालावधी कोणता, जनावर विकत घेण्यासाठी गोकुळ दूध संघाकडून किती अनुदान आहे इत्यादी माहिती यावेळी त्यांनी उपस्थित दूध उत्पादकांना दिली.
या कार्यक्रमासाठी दुसरे साधन व्यक्ती डॉक्टर गजानन कापरे यांनी यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना झालेल्या आजारांची लक्षणे कशी ओळखावी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद गणू पाटील यांनी यावेळी उपस्थितना संबोधित केले. या कार्यक्रमासाठी गोपाळ पाटील, एस. के. पाटील, एस. एस. आवडण, एस. आर. पाटील, प्रकल्पाधिकारी डॉ. एस. एन. पाटील, प्रा. एस. बी. दिवेकर, डॉ. एन. के. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, श्रीनिवास पाटील, आर. एस. पाटील, पी. पी. धुरी व बागिलगे गावचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment