दिल्ली येथील साहित्य संमेलनासाठी किटवाड च्या जोतिबा पाटील यांच्या कवितेची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2025

दिल्ली येथील साहित्य संमेलनासाठी किटवाड च्या जोतिबा पाटील यांच्या कवितेची निवड

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      यावर्षी राजधानी दिल्ली येथे सरहद पुणे आयोजित दिनांक २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कवीकट्टा समितीतर्फे 'चंदगड लाईव्ह न्यूज'चे कुदनूर प्रतिनिधी जोतिबा आप्पाजी पाटील (किटवाड, ता. चंदगड) यांच्या कवितेची निवड करण्यात आली आहे. 

    छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा नवी दिल्ली येथे भरणाऱ्या तीन दिवशीय साहित्य संमेलनात कविता सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरद पवार हे स्वागतिध्यक्ष असून संमेलनाचे अध्यक्ष डॉ तारा भवाळकर आहेत, ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत हे संमेलन होणार असून जोतिबा पाटील यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. चंदगड तालुका पत्रकार संघ, ज्ञान सेवा त्याग युवक मंडळ किटवाड व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना दिल्ली येथे रवाना होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment