चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन केले जाते. ते शक्यतो जवळच्या नदीपात्रात किंवा तीर्थक्षेत्र स्थळी असलेल्या नद्यांमध्ये करण्याचा प्रघात आहे. तथापि जंगमहट्टी, ता चंदगड येथील वर्पे कुटुंबीयांनी या रिवाजाला फाटा देत आपल्या वडिलांच्या आस्थी व रक्षाविसर्जन शेतातील झाडांच्या मुळांना करून एक परिवर्तनवादी पायंडा पाडला आहे.
कोलीक शाळेचे अध्यापक अशोक वर्पे यांचे वडील गोपाळ रामा वर्पे यांचे ५फेब्रुवारी २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या अस्थि व रक्षा नदीत न करता ते शेतातील काजु झाडांना करण्यात आले. नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत रोज हजारो मृत व्यक्तींची रक्षा व अस्थि नदीमध्ये विसर्जित केल्याने नद्यांच्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. हे थांबवण्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे चंदगड तालुक्यात काही गावांमध्ये कुटुंबीयांच्या पुढाकारातून असे उपक्रम होत आहेत हे निश्चितच अनुकरणीय असले तरी ही संख्या अगदीच नगण्य आहे. जंगमहट्टी येथील वर्पे कुटुंबीयांनी केलेला हा उपक्रम हा समाज प्रबोधनाचे कार्य करणारा ठरेल.
या कामी त्यांचे लहान चिरंजीव,कोलीक विद्यालयाचे सहाय्यक अद्यापक अशोक वर्पे, इतर भांवडे कुटुंबीय, नातेवाईक तसेच भाऊबंद यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment