आपल्या मारुती ओमनी व्हॅन सह नारायण जोशी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिरात 'सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब' च्या अखंड गजरात ७ दिवस चाललेल्या महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण व अशा प्रकारच्या एकमेव अखंड नाम सप्ताहाची मंगळवार दि. ११/३/२०२५ रोजी समाप्ती झाली. या दिवशी झालेल्या महाप्रसादाचा लाभ कोल्हापूर व बेळगाव जिल्हा व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे १५ हजार भाविकांनी घेतला.
कालकुंद्री गाव हे कोवाड- बेळगाव मार्गापासून दोन किलोमीटर आत असल्यामुळे बसने येणाऱ्या भाविकांची कोवाड किंवा कागणी पासून पुढे येताना गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून कालकुंद्री येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शाखाप्रमुख व विभाग प्रमुख नारायण महादेव जोशी उर्फ ठाकरे यांनी आपली मारुती ओमनी व्हॅन काल दिवसभर या मार्गावर भाविकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. भाविकांचे ने आण करण्यासाठी या गाडीने कालकुंद्री ते कोवाड हे पाच किलोमीटर अंतर दिवसभरात २७ वेळा फेऱ्या मारत भाविक व प्रवाशांची सेवा केली. ही आगळ्यावेगळी सेवा अखंड नाम सप्ताह निमित्त आलेल्या भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. आलेल्या भाविकांतील महिला व वृद्ध भाविकांनी नारायण जोशी यांना या सेवेबद्दल भरभरून आशीर्वाद दिले. ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले.
जोशी यांच्या या उपक्रमात ड्रायव्हर म्हणून त्यांना मैनुद्दीन शेख, सयाजी नारायण जोशी, युवराज पाटील यांचेही सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment