चंदगड : सी एल वृत्तसेवा
तिलारीनगर (ता. चंदगड) येथील ग्रीन व्हॅली हॉटेलपासून जवळ असलेल्या धबधब्यात बुडून कर्नाटक राज्यातील एकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी घडली. अभिनव चंद्रशेखर अंकलगी, वय २१ वर्षे, रा. वडगेर, ता. यड्रामी, जिल्हा कलबुर्गी कर्नाटक असे असून या घटनेची वर्दी वडील चंद्रशेखर शरणाप्पा अंकलगी यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, घटनेतील अभिनव आपल्या मित्रांसोबत ग्रीन व्हॅली धबधबा पाहण्यासाठी तिलारी येथे आला होता. धबधब्याच्या खालील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. यावेळी मित्र, जवळचे नागरिक व त्यानंतर रेस्क्यू टीमने सुद्धा शोध घेऊनही तो सापडला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी पुन्हा यांनी शोध घेऊन त्याला मृतावस्थेत पाण्यातून बाहेर काढले. घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा कायदा २०२३ चे कलम १९४ नुसार झाली आहे. या घटनेचा अधिक तपास चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पो. हे. कॉ. अंबुलकर एक करत आहेत.
No comments:
Post a Comment