हातातील टोकदार कड्याने शिनोळी येथे एकास मारहाण - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2025

हातातील टोकदार कड्याने शिनोळी येथे एकास मारहाण



चंदगड : सी एल वृत्तसेवा
   शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे हातातील टोकदार कड्याने मारहाण करून दोघांनी एकास जखमी केले. ही घटना दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी शिनोळी येथे कलमेश्वर मंदिर शेजारी शाळेजवळ घडली. याबाबतची फिर्याद वैजनाथ गोविंद तानगावडे, रा. शिनोळी बुद्रुक यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. यावरून संशयित आरोपी सुरेश यशवंत तानगावडे व सुमित यशवंत तानगावडे दोघेही राहणार शिनोळी बुद्रुक यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता २०२४ चे कलम ११८ (१), ३५२- ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   या घटनेची चंदगड पोलिसातून मिळालेली सविस्तर माहिती अशी, घटनेतील फिर्यादी वैजनाथ तानगावडे यांचा चुलत भाऊ राम तानगावडे व आरोपी यांच्यातील भांडणे रघुनाथ तानगावडे यांनी मिटवली होती. याचा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत शाळेत बसले असता दोन्ही आरोपी यांनी हाक मारून त्यांना बाहेर बोलावून घेतले व शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी समजावून सांगत असताना हातातील गोल टोकदार कड्याने मारहाण करून जखमी केले. याबाबतची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोहेकॉ कुरणे हे अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment