तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी निमित्त रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज चॅनल वर करण्यात येणार आहे. या थेट प्रक्षेपणाचा लाभ कुस्ती शौकीन आपल्या मोबाईलवर घरबसल्या किंवा प्रवासात कुठेही घेऊ शकतात. याच सी एल न्यूज चॅनेल वरून निट्टूर येथील कुस्ती मैदानाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ हजारो कुस्ती शौकीन व नागरिकांनी घेतला होता.
तेऊरवाडी येथील बसवाना देवालय शेजारी, कोवाड- तेऊरवाडी रोड, खडीमशीन नजीक होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांक ची कुस्ती शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा पैलवान सुरज मुंडे विरुद्ध डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यात होणार असून दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा पै गणेश मुंडे विरुद्ध कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटील (कंग्राळी), तृतीय क्रमांकाची कुस्ती विक्रम जाधव (शिनोळी), विरुद्ध श्रीशैल पाटील (अथणी कर्नाटक), याशिवाय अनुक्रमे सुनील करवते (कवठेपिरान) विरुद्ध तेजस मोरे शाहू कुस्ती केंद्र, पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) विरुद्ध राहुल आलदर (सांगली), ओमकार पाटील (राशिवडे) विरुद्ध केंपान्ना जोगी (कर्नाटक चॅम्पियन दावणगिरी), आदित्य पाटील (कवठेपिरान) विरुद्ध राजवर्धन पाटील (शाहू कुस्ती केंद्र), मोहन पाटील (शाहू कुस्ती केंद्र) विरुद्ध निखिल पाटील (कंग्राळी) आदी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सुमारे ६० कुस्त्या लावल्या जाणार आहेत. याशिवाय खास आकर्षक म्हणून कर्नाटक केसरी पार्थ पाटील (कंग्राळी) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन विवेक लाड कोल्हापूर, महाराष्ट्र चॅम्पियन शुभम पाटील (तेऊरवाडी) विरुद्ध अजित पाटील (सांगली) तर दत्तू रामचंद्र गावडे (हरळी) यांच्या वतीने जंगी मेंढा साठी पै कार्तिक जाधव (निट्टूर) विरुद्ध पै जीवन गावडे (दाटे) तर शिवाप्पा सिद्धाप्पा धनगर (सलामवाडी) यांनी दिलेल्या जंगी मेंढ्यासाठी पै राजू पाटील (शिनोळी) विरुद्ध पै भूमिपुत्र (मुतगा) यांच्यात लढत होणार आहे.
आखाडा पूजन निवृत्ती पाटील, लक्ष्मण भिंगुडे, प्रकाश पाटील, बाबू पाटील, सुबराव पाटील, मारुती पाटील, जानबा राजगोळकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनाची कुस्ती पै विक्रांत पाटील (तेऊरवाडी) विरुद्ध पै जीवन गावडे (दाटे) यांच्यात होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पिंटू नाईक तुर्केवाडी यांच्याकडून चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आली आहे.
आखाडा पंच म्हणून प्रकाश दळवी, शंकर पाटील, लक्ष्मण भिंगुडे, रामू भिंगुडे, शिवाजी भिंगुडे आदी काम पाहणार आहेत यावेळी हलगी सम्राट अक्षय आवळे यांचे पथक आपली हलगी कला सादर करणार असून कुस्त्यांचे धावते समालोचन रामदास गायकवाड (कवठेपिरान) हे करणार आहेत. सूत्रसंचालन एम. ए. पाटील, एन. व्ही. पाटील, एम. बी. पाटील व रामराव गुडाजी करणार आहेत. या कुस्ती मैदानाचा तसेच सी एल न्यूज वरून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा लाभ कुस्ती व क्रीडा शौकिनांनी घ्यावा असे आवाहन श्रीराम तालीम मंडळ व ग्रामस्थ तेऊरवाडी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment