निट्टूरची अनुजा लोहार 'अन्नपूर्णा मानिनी' पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2025

निट्टूरची अनुजा लोहार 'अन्नपूर्णा मानिनी' पुरस्काराने सन्मानित

कालकुंद्री येथे वक्तृत्व स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना अनुजा लोहार

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथील बीएससी भाग १ ची विद्यार्थिनी कु. अनुजा दत्तात्रय लोहार (निट्टूर, ता. चंदगड) हिला नुकतेच अन्नपूर्णा मानिनी अवार्डने सन्मानित करण्यात आले. अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च सेंटर संकेश्वर यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त अनुजा हिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
   तिने नुकत्याच कालकुंद्री (ता. चंदगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. यापूर्वी तिने चंदगड तालुक्यासह कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन शेकडो बक्षीसे जिंकली आहेत. तिला मिळालेल्या मानिनी पुरस्काराबद्दल तिचे चंदगड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment