भारतीय सिनेसृष्टीतील ध्रुवतारा निखळला, स्व. मनोज कुमार यांना रांगोळीतून श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2025

भारतीय सिनेसृष्टीतील ध्रुवतारा निखळला, स्व. मनोज कुमार यांना रांगोळीतून श्रद्धांजली



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   भारतीय चित्रपट सृष्टीतील ध्रुवतारा देशभक्तीपर चित्रपट निर्मितीसाठी परिचित असलेले लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित असलेले चतुरस्त्र कलाकार, पडद्यावरचे भारत कुमार उर्फ मनोज कुमार (हरी किशन गिरी गोस्वामी) यांचे काल शुक्रवार दि. ४/४/२०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारख्या देशभक्ती चित्रपटातून त्यांनी देशातील तरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले.
  मनोज कुमार यांच्या निधनानिमित्त  वडगाव बेळगाव येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी त्यांना आपल्या रांगोळी कलेतून अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. पद्मश्री मनोज कुमार यांची ब्लॅक अँड व्हाईट मधील रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेली भावमुद्रा त्यांनी आपल्या ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, वडगाव- बेळगाव येथे पाहण्यासाठी खुली ठेवली आहे. ही रांगोळी नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ८.३० पर्यंत १० एप्रिल पर्यंत पाहता येईल. यापूर्वी अजित यांनी विविध प्रसंगी ऐतिहासिक, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक व्यक्ती, स्वातंत्र्योत्तर काळातील महनीय  नेते अशा अनेक रांगोळ्या रेखाटून रांगोळी प्रेमींच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. स्वर्गीय मनोज कुमार यांची ब्लॅक अँड व्हाईट रांगोळी सुद्धा लक्षवेधी ठरली आहे. 

No comments:

Post a Comment