उद्या (दि.६) होणाऱ्या तेऊरवाडी कुस्ती मैदानाचे 'सी एल न्यूज' वर थेट प्रक्षेपण, कुस्ती शौकीनांना उत्सुकता - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2025

उद्या (दि.६) होणाऱ्या तेऊरवाडी कुस्ती मैदानाचे 'सी एल न्यूज' वर थेट प्रक्षेपण, कुस्ती शौकीनांना उत्सुकता

 


तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी निमित्त रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण चंदगड तालुका व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे मुखपत्र मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न, चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज' चॅनल वर करण्यात येणार आहे. निट्टूर येथे  गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या ऐतिहासिक शतकोत्तर कुस्ती मैदानाच्या यशस्वी थेट प्रक्षेपणानंतर तेऊरवाडी येथील मैदानाच्या थेट प्रक्षेपणाची उत्सुकता कुस्ती शौकीन व नागरिकांना लागून राहिली आहे.
    तेऊरवाडी येथील बसवाना देवालय शेजारी, कोवाड- तेऊरवाडी रोड, खडीमशीन नजीक होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांक ची कुस्ती शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा पैलवान सुरज मुंडे विरुद्ध डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यात होणार असून याशिवाय राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटूंच्या सुमारे ६० कुस्त्या लावल्या जाणार आहेत. 
     या कुस्ती मैदानाचा तसेच सी एल न्यूज वरून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा लाभ कुस्ती व क्रीडा शौकिनांनी घ्यावा असे आवाहन श्रीराम तालीम मंडळ व ग्रामस्थ तेऊरवाडी यांनी केले आहे.
             कुस्ती लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment