मोदगे येथील कृष्णा कोकीतकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2025

मोदगे येथील कृष्णा कोकीतकर यांचे निधन

  

कृष्णा कोकीतकर

चंदगड : सी एल वृत्तसेवा

 मोदगे ( ता. हुकेरी) येथील  प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा  उर्फ भागोजी भरमा कोकीतकर ( वय 61) यांचे हृदयविकाराने बुधवारी (दि. 2) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, पुतण्या, भावजय असा परिवार आहे. ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य व गावातील विठ्ठल भावेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी उपसचिव होते. तसेच मुंबई येथील मोदगेकर ग्रामस्थ मंडळाचे ज्येष्ठ सभासद, मार्गदर्शक होते. गावातील ओंकार गणेशोत्सव मंडळाचे सचिव होते. त्यांनी 61 वेळा रक्तदान करून  मोदगे परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.  सामाजिक कार्याबद्दल त्यांचा भारत गौरव म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 7) सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment