कामेवाडी येथील महादेव पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2025

कामेवाडी येथील महादेव पाटील यांचे निधन

महादेव वैजू पाटील
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   कामेवाडी, ता. चंदगड येथील रहिवाशी महादेव वैजू पाटील वय ६० यांचे आकस्मिक निधन झाले. चंदगड, आजरा गडहिंग्लज या तीन तालुक्यात सहकार क्षेत्रातील अधिकारी (ए आर ऑफिसर) म्हणून त्यांनी ३३ वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कामेवाडी सारख्या आदिवासी महादेव कोळी समाजातून आलेल्या महादेव यांचा नोकरीतील प्रवास शिपाई पदापासून श्रेणी २ अधिकारी पदापर्यंत पोहोचला होता सर्वांशी आदराने वागणारे व्यक्तिमत्व होते. सहकारी कार्यालयातील कर्मचारी वर्गात ते आण्णा म्हणून ओळखले जात.

No comments:

Post a Comment